देव जर आहे,तर तो सर्वांना सुखी का ठेवत नाही
दण्डवत प्रणाम... एका मंदिराच्या बाजुला एका न्हाव्याचे दुकान होते. मंदिराचा पुजारी व न्हावी यांची मैत्री होती. न्हावी नेहमी त्या पुजाऱ्याला विचारत असे, " देव जर आहे,तर तो सर्वांना सुखी का ठेवत नाही ? कधी दुष्काळ, कधी महापूर, कधी महामारी अश्या अनेक आपत्ती का." पुजारी तेव्हा काहीच बोलत नसत. एके दिवशी ते पुजारी त्या न्हाव्याला घेवुन, देवळा बाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याकडे गेले. त्या भिकाऱ्या कडे पहात पुजारी बुवा त्या न्हाव्याला म्हणाले, त्याचे केस खूप वाढले आहेत,दाढी पण खूप वाढली आहे. पुजारी त्या न्हाव्याला म्हणाले, तू असतांना याचे केस,दाढी इतके का वाढलेले आहेत? न्हावी म्हणाला, भिकारी माझ्या जवळ आलाच नाही. त्याने माझ्याशी सम्पर्क केलाच नाही. मग मी काय करणार? पुजारी म्हणाले,अगदी बरोबर! जसा त्या भिकाऱ्याने तुझ्याशी संपर्क केला नाही, म्हणून त्याची अशी अवस्था झाली, तसंच आपण जर ईश्वराच्या संपर्कात आलोच नाही,त्याची आराधना...