तीन सारख्या मूर्ती
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी 114 दृष्टांत सांगितले आहे त्यातील हा एक दृष्टांत त्योड्या वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे,सुज्ञ व्यक्तींनी समजून घ्यावा.
सर्व साधू-संत सांगतात की, परमार्थात श्रवण महत्त्वाचे, पण तेच श्रवण कसे असावे...ना बिरबलाच्या मूर्ती सारखं! एकदा अकबराने तीन सारख्या मूर्ती आणल्या. सर्वात चांगली मूर्ती कोणती ते बिरबलाला शोधून काढायला सांगितलं. त्या तीनही मूर्तींच्या कानात छिद्र होती. बिरबलाने तीनही मूर्तींच्या कानातील छिद्रातून एक एक बारीक तार घातली. एका मूर्तीच्या कानातून घातलेली तार मूर्तीच्या दुस-या कानातून बाहेर आली. दुस-या मूर्तीच्या कानातून घातलेली तार तोंडातून बाहेर आली व तिस-या मूर्तीच्या कानातून घातलेली तार हृदयातून आली. बिरबलाने सांगितले 'ही तिसरी मूर्ती चांगली आहे!
श्रोते तीन प्रकारचे असतात. एक प्रकार म्हणजे एका कानाने ऐकून दुस-या कानाने सोडून देतात. दुसरे श्रोते एका कानाने ऐकतात व ऐकलेले दुस-याला सांगतात. तिसरे श्रोते कानाने ऐकलेले ह्रुदयात साठवतात. त्याचे मनन, चिंतन करतात!म्हणून साधूसंत सांगतात, आपण जे श्रवण करतो, वाचन करतो त्याचे मनन करावे आणि आपल्या आचरणात आणावे आणि हे सगळे करता करता भगवंताच्या नामसाधनेत रंगून जावे.
दंडवत प्रणाम 🙏
Comments
Post a Comment