भक्ताची देवासाठी भूमिका
देव हा संसार प्राप्तीचे साधन नसावा , देव जीवनाचे साध्य असावा.
अट्टाहास देवाकडून मिळवण्यासाठी नसावा, देव मिळवण्यासाठी असावा.
देवाला मागण्यासाठी भक्ति नसावी, देव मागण्यासाठी भक्ति असावी.
आपले जीवन देवाकडून सुख मिळविण्यासाठी नाही, तर देवाला प्रसन्न करण्यासाठी असावे.
देवाकडे आपल्यासाठी मागू नये, मागायचे असल्यास देवा साठीच मागावे.
देवाला आपले दु:ख सांगू नये, उलट सर्व दु:ख लपवून मी तुझ्या कृपेने सुखी आहे म्हणावे.
देवा समोर प्रपंचाचे गाणे कधीच मांडू नये, सतत परमार्था विषयीच बोलावे.
देवधर्म हा खेळ नसून, आपण देवाचे खेळणे आहोत हे कळावे.
देवाच्या प्रभूतेवर कधीच संशय घेऊ नये, उलट सतत देवावर दृढ विश्वास ठेवावा.
देवाची परीक्षा पाहू नये, देवासाठी आपण परीक्षा द्यावी.
देव आपले कार्य करण्यासाठी नसून, आपण देवाचे कार्य करण्यासाठी आहोत हे जाणून घ्यावे.
कशाचाही दोष देवाला देण्यापेक्षा, स्वतःचे कर्म तपासून आपली योग्यता आधी पहावी.
मी देवासाठी काही करतो म्हणण्यापेक्षा, देवच माझ्यासाठी फार काही करत आहे, हे जाणून घ्यावे .
देवाला आपली इच्छा सांगण्यापेक्षा, प्रत्येक गोष्टीला देवाची इच्छा समजावे.
देवाला आपल्या कडे लक्ष ठेवायला लावण्या पेक्षा, आपण सतत देवाकडे लक्ष ठेवून रहावे.
मला फार कळते म्हणण्या पेक्षा, देव सर्वज्ञ आहे म्हणावे.
देवाने मला काय दिले म्हणण्याआधी, मी देवाला काय दिले हे आधी पहावे.
मी देवाला काही देतो म्हणण्यापेक्षा, देवच मला भरभरून देतो आहे असा निश्चय व्हावा.
देव आपल्यासाठी काय करील यापेक्षा, आपण देवासाठी काय केलं पाहीजे, याचा विचार करावा.
देवाला आपले दोष दिसण्यापेक्षा, आपण आधीच ते देवा समोर कबूल करावे.
देवासमोर शहाजुकपणा सांगण्याआधी, आपला अधिकार तपासून पहावा.
देवाला आपलं करण्याआधी, आपण पूर्णपणे देवाचं व्हावं.
देवाने आपल्याला सांभाळावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा, आपणच देवाला स्वतःच्या हृदयात सांभाळावे.
देवाने त्याची कृपा दाखवून देण्यापेक्षा, आपणच त्याची कृपा जाणून घ्यावी.
Comments
Post a Comment