Posts

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!!

Image
उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला.. नमन असो माझा त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला....  ७५, व्या अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या श्री चक्रधर ईश्वर भक्ती ग्रुप कडून आपण आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!.. 💐🙏🇮🇳 आमचे स्वामी श्री चक्रधर स्वातंत्र्याचं महत्व सांगत असतांना म्हणतात "स्वातंत्र्य हा मोक्ष,पारतंत्र्य हा बंध" कोणत्याही बाबतीत स्वातंत्र्य हे महत्वाचे असणं गरजेच आहे मग ते धर्म आचरन्याच्या बाबतीत असो वा दैनंदिन जीवनात असो स्वातंत्र्य हे महत्वाचे.  दंडवत प्रणाम...🙏🌹

पविते पर्व - अर्थात एक पवित्र विधी...

Image
स्वामींच्या सन्निधाना पासून ते आज पावेतो पविते पर्वकाळ हा पवित्रविधी महानुभाव पंथात चालत आलेला आहे. पविते पर्वाच एक आगळ वेगळ वैशिष्ट्य आहे, पविते अर्पण करणे म्हणजे हा पवित्र विधी अर्थात आपल्या श्रेष्ठ व्यक्ती, गुरु जनांन प्रती आदर व्यक्त करणे होय. येणे करुन आपल्याही चित्ताची शुध्दता व मनाला पवित्रता प्राप्त होते. सर्व आश्रमा मधे हा सोहळा दिवाळी सना प्रमाणे मोठ्या हर्षोल्हासात संपन्न होत असतो. श्री गुरुजींची पालखी मधून काढलेली सवाद्य अशी भव्य शोभा यात्रा. श्री गुरुंना पूजन विधी साठी केलेले ते भद्रासन, पुजेची केलेली आरास. सर्व परिसर रोषणाई ने सजलेला. श्रीगुरुंच्या ठिकानी श्रध्देने व स्वकष्टाने बनविलेले वेगवेगळ्या प्रकारचे नक्षिकाम केलेले पवित्याचे नारळ. सर्व गुरुबंधु, संत-तपस्विनी,वासनिक वर्ग आपल्या मनामधे एक पवित्र भावना घेऊन श्रीगुरुंच्या भेटीला आलेले असतात. सर्व गुरुबंधु श्रीगुरुंना भेट व पविते अर्पण करण्यासाठी आलेले असल्यामूळे सर्वांची एकाच ठिकानी होणारी अपुर्व व प्रेमळ अश्या भेटीचा योग. सर्व कसं आनन्दमय वातावरण असत. म्हणून म्हटलं आहे ना " आनंदाचे डोही आनंद तरंग...

उपदेशी नामधारक साधकांचा आचारधर्म

Image
परमार्ग      परमार्ग हा ईश्वरीचा मार्ग आहे. धर्माची जोपासना व धर्मसंस्कार आश्रमामधुन केले जातात. आश्रमामध्ये देवाची आराधना,नामस्मरण, विधी अखंड चालु असतो. तेथील संतांचा ईश्वराला अभिमान असतो म्हणुन आपण आश्रमांमधे गेल्यानंतर तेथील साधुसंतांशी प्रेमाने वागुन आदर केला पाहीजे. आपण कोणाही संतांचा अपमान करू नये त्यांचे मन दुखवू नये. असे केल्याने घोरनर्क भोगावे लागतात. सर्व साधु संतांच्या सहवासात असावे त्यांचे तन मन धनाने भजन पुजन करावे. हे त्या मार्गातील हे या मार्गातील (कपड्यांवरून) असा भेदभाव करु नये, असे केल्याने देवाला थोर खंती येते म्हणुन याची काळजी घ्यावी.       ज्योतिष इतर शास्त्राचे नियम पाळू नये तसेच तंत्र मंत्रसुद्धा करू नये गंडेदोरे, खड्याचा अंगठ्या बांधू नये छु छा यांचा मागे लागु नये कारण आपण जे सुख दु:ख पाप जोडले असेल ते तर भोगावेच लागेल.       आपल्या कर्माने जे दु:ख प्राप्त झालेले आहे ते सर्व दुःख दुर करण्यासाठी परमेश्वराचेच स्मरण व प्रार्थना करावी.  आपले दुःख इतरांना सांगत फिरु नये ज्योतिषांना आपला हात दाखवु नये. आपल्या...

देवाची प्राप्ती कोणाला होते

 एक राजा होता, सद्भक्त होता,त्याला देव प्रसन्न झालें, देव म्हणालें, राजा तुला जे हवे ते माग. राजा प्रजेच्या हिताचा विचार करायचा, त्यांच्या सुखी जीवनाचा विचार करायचा म्हणाला देवा जसे आपण मला दर्शन दिले तसे राज्यातील प्रत्येकाला दर्शन ध्या म्हणजे सारे सुखी होतील. देव म्हणाले राजा हे असंभव आहे प्रत्येकालाच देव हवा आहे असे नसते, पण राजा प्रजेचे हित पाहणारा होता त्याने हट्टच केला, देव म्हणाला ठीक आहे समोरच्या डोंगरावर सर्वांना घेऊन ये मी दर्शन देईन . राजाला खूप आनंद झाला, दुसऱ्या दिवशी साऱ्या प्रजेला घेऊन डोंगराकडे निघाला. चालता चालता लोकांना एके ठिकाणी तांब्याची नाणी दिसली काही लोक ती जमवू लागली, राजा म्हणाला अरे यापेक्षा महत्वाचे आपणाला भेटणार आहे चला माझ्याबरोबर पुढे चला पण त्यानी राजाचे ऐकले नाही, राजा इतरांना घेऊन पुढे निघाला  तर पुढे चांदीची भरपूर नाणी  दिसली आणि काही लोक तिकडेच धावले त्यांनी असा विचार केला पहिले चांदीची नाणी घेऊ मग देवाला भेटू देव कुठं जातोय? राजा म्हणाला त्या चांदीच्या नाण्यासाठी नशिबाला लाथ मारू नका पण कोणच ऐकायच्या मनस्थिती नव्हते प्रत्येक जण नाणी ज...

श्रीपंचकृष्ण अवतार परंपरा

जय श्रीकृष्ण      कृतयुगामध्ये सनक, सनकादिक, सनतकुमार व सनतनंदन हे ब्रह्मदेवाच्या वरामुळे जन्मलेले चार पुत्र. त्यांनी ब्रह्मदेवापासून सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला, "हे तात, पुष्कळ ज्ञान तुम्ही आम्हाला सांगितले, परंतु त्यामध्ये जीवांच्या उद्धाराचे म्हणजेच जन्म-मरणाच्या फे-यांपासून मुक्त होऊन परमेश्वराचे सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त करण्याचे मोक्षाचे ज्ञान सांगितले नाही. तरी ते आम्हाला सांगा." ब्रह्मदेवाला ते ज्ञान नसल्यामुळे तो चिंतातूर होऊन त्याने अंतरी परमेश्वराचा धावा केला "हे परमेश्वरा, माझी लाज राख." त्यावेळी परब्रह्म परमेश्वराने हंसावतार घेऊन सनक, सनकादिकांना ब्रह्मविद्येचे ( मोक्षमार्गाचे ) ज्ञान दिले.       कृतयुगापर्यंत ते ज्ञान काही प्रमाणात होते. नंतर काळाच्या ओघात त्या ज्ञान धर्माला ग्लानी येऊन मूळ तत्व विराम पावले. त्यामुळे अनेक ऋषी - मुनी अगदी तन्मयतेने देहाची पर्वा न करता तपश्चर्या करतांना व भक्तीमार्गाविषयी चर्चा करीत असता ऋषी ऋषींमध्ये मतांतरे होऊन अवांतर भक्तीमार्ग उदयाला आले. त्या भोवऱ्यात सामान...

जिवोध्दारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन

Image
जिवोध्दारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी वर्ष दिनांक 08/09/2021 रोजी मध्यान काळी 12. वाजता सम्पन्न होत असलेल्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...      जेव्हा काळरात्र होऊन सर्वत्र काळोख दाटतो व या काळोखात सकळ प्राणिमात्र चाचपडायाला लागतात, तेव्हा त्या काळोखाचा अंत करण्यासाठी क्षीतीजावर सहस्त्रावधी प्रकाशकिरणांची उधळण करीत सुर्यबिंब उदयाला येते. त्याप्रमाणे आज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला परमेश्वर भक्तीचा प्रकाश देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी बाराव्या शतकात महाराष्ट्रात परब्रम्ह परमेश्वर अवतार. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा उदय (अवतार) झाला.व महाराष्ट्रीय समाज  श्रीचक्रधर स्वामींच्या अमृतमय ज्ञानप्रकाशाने उजळून निघाला.      बाराव्या शतकात महाराष्ट्रातील वैदीक धर्म पुरोहीतांनी समाजात चातुर्वण्य व्यवस्थेचे स्तोम माजविले होते .जातीय बंधने कठोर करून तथाकथित शुद्रांना अस्पृश्यांना धर्माची दारे बंद करून गावाबाहेर हाकलून देण्यात आले होते. स्त्रियांना धर्मग्रंथ आध्ययनाचा, संन्यास घेण्याचा, धार्म...

पविते पर्व

Image
दि.21 व 22/08/ 2021 ला पविते पर्व...अर्थात गुरु पूजन सोहळा... गोविंद... गोविंद... पविते म्हणजे पवित्र ( पवित्र धागा, जाणवे ) आणि पर्व म्हणजे सण, उत्सव.... श्रावण महिन्यातील पवित्र अशा सणाच्या सर्व अच्युत गोत्रिय परिवाराला हार्दिक शुभेच्छा  पवीते वाहताना नारळ दोरा सुपारी या वस्तु प्रामुख्याने लागतात. तर चला मग प्रत्येकाचे महत्त्व समजून घेऊ या. ⚡मग नारळ हे जीव स्वरूपाचे प्रतीेक आहे ⚡दोरा हा जीवाच्या कर्म माळीकेचे प्रतीक आहे. ⚡सुपारी ही मनोधर्म,जीवर्धाचे प्रतीक आहे. परमेश्र्वराला आपले सर्वस्वच समर्पण करणे हा पविते वाहण्याचा भाव आहे. गोविंद हा शब्द मुख्यत्वे बोलल्या जातो तर गोविंद शब्दाचा अर्थ आहे, प्राप्त करून देणारा, म्हणजे पूथ्वीवर, ईंद्रियावर विजय प्राप्त करून देनारा भवसागरातुन मुक्त करनारा हे कधी होनार ज्या वेळेस आपण आपले सर्वस्व जीवनच परमेश्र्वराला समर्पित करू तेव्हा. पवित्याला प्रमुख्याने कोणता रंगाचा धागा बांधावा व का? पवीत्याला पांढरा रंगाचा धागा बांधावा कारण जीव स्वरूप हे स्पटीकासारखे पांढरे आहे व दोरा हा जीवाच्या कर्म मालीकेचे प्रतिक आहे,म्हनुन पांढरा धागा बां...