पविते पर्व - अर्थात एक पवित्र विधी...
स्वामींच्या सन्निधाना पासून ते आज पावेतो पविते पर्वकाळ हा पवित्रविधी महानुभाव पंथात चालत आलेला आहे. पविते पर्वाच एक आगळ वेगळ वैशिष्ट्य आहे, पविते अर्पण करणे म्हणजे हा पवित्र विधी अर्थात आपल्या श्रेष्ठ व्यक्ती, गुरु जनांन प्रती आदर व्यक्त करणे होय. येणे करुन आपल्याही चित्ताची शुध्दता व मनाला पवित्रता प्राप्त होते. सर्व आश्रमा मधे हा सोहळा दिवाळी सना प्रमाणे मोठ्या हर्षोल्हासात संपन्न होत असतो. श्री गुरुजींची पालखी मधून काढलेली सवाद्य अशी भव्य शोभा यात्रा. श्री गुरुंना पूजन विधी साठी केलेले ते भद्रासन, पुजेची केलेली आरास. सर्व परिसर रोषणाई ने सजलेला. श्रीगुरुंच्या ठिकानी श्रध्देने व स्वकष्टाने बनविलेले वेगवेगळ्या प्रकारचे नक्षिकाम केलेले पवित्याचे नारळ. सर्व गुरुबंधु, संत-तपस्विनी,वासनिक वर्ग आपल्या मनामधे एक पवित्र भावना घेऊन श्रीगुरुंच्या भेटीला आलेले असतात. सर्व गुरुबंधु श्रीगुरुंना भेट व पविते अर्पण करण्यासाठी आलेले असल्यामूळे सर्वांची एकाच ठिकानी होणारी अपुर्व व प्रेमळ अश्या भेटीचा योग. सर्व कसं आनन्दमय वातावरण असत. म्हणून म्हटलं आहे ना " आनंदाचे डोही आनंद तरंग" वातावरण आनंदी, सर्वांच्या भेटीचा आनंद, सर्वांच्या मनात आनंद लहरी.. सर्व कसं आनंदच आनंद... म्हणून या पविते पर्वाचं एक अस आगळ वेगळ वैशिष्ट्य आहे. या वर्षीही हा पवित्र सोहळा दि.10/08/2022 अर्थात श्रावण शुध्द चतुर्दशी या दिवशी सायंकाळी देवास पविते समर्पन सोहळा संपन्न होईल. श्री गुरु व श्रेष्ठ व्यक्तीस दि.11,22,13/08/2022 या दिवशी सर्व आश्रमात पविते पर्व संपन्न होईल. सर्व पंथीय साधकांनी चतुर्दशिच्या दिवशी विषेशांना स्नान घालावे, गंध-अक्षदा, फुलहार,फुलं, नवीन वस्त्र, समर्पण करून पविते ओळगवावे (वाहावे). उपहार ( नैवेद्य) दाखवावा, धुप दाखवावा, पंचआरती ओवाळून विडाची आरती,बीड स्थानाची पवित्याची आरती, उपहाराची आरती म्हणावी. व बीडची लिळा स्मरण करावी,आठवावी. पविते वाहताना एक नारळ, दोन सुपारी, दोरा( सुत ) हे प्रामुख्याने लागतात.
🌹नारळ- हे जीव स्वरूपाचे प्रतीक आहे.
🌹दोरा- हा जिवाच्या कर्म माळीकेचे प्रतीक आहे.
🌹सुपारी- ही मनोधर्म, जीव धर्माचे प्रतीक आहे. परमेश्वराला आपले सर्वस्व समर्पण करण हे पविते वाहण्याचा भाव आहे.🙏
हे श्रीचक्रधर स्वामी महाराज..! आपण दयाळु मयाळू आहात. बाईसा , नागदेवाचार्य,माहिमभट्ट,दादोस, परसनायक,महादाईसा,आबाईसा,
उमाईसा, एल्हाईसा,जसमाईसा, इन्द्रोबा अशा अनेक भक्तांना करचरनवंत ब्रम्ह भजन्या पुजन्यासाठी आपल्या रुपाने लाभले.ते अतीव भाग्ग्याचे जीव होते म्हणून आपल्या सन्निधानाचा योग त्या अधिकारी जिवांना प्राप्त झाला, मी अनधिकारी,अपवित्र आहे. वाहात वाटोळे प्रमाणे या भवचक्रात मी पडलो आहे. मला या भवार्नवातुन तारुण, आपल्या सन्निधचा माझाही योग लवकर यावा व मला आपुले भजन पूजन घडावे व आपले प्रेमदान मज पामराला लाभावे. अशी नम्रतापर्वक प्रार्थना या पर्वाच्या दिवशी स्वामींना करावी.
सर्व संत महंत व अच्युत गोत्रिय सद्भक्तांना पविते पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण प्रभुजी.
🙏
Dandavat pranam
ReplyDeleteदंडवत प्रणाम
ReplyDeleteदंडवत प्रणाम
ReplyDeleteDandvt pranaam jay shree krishna🙏💕🙏💕
ReplyDeleteदडवत प्रणाम जय श्री कृष्णा
ReplyDeleteDandvat pranam🙏
ReplyDeleteदंडवत प्रणाम
ReplyDelete