जिवोध्दारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन
जिवोध्दारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी वर्ष
दिनांक 08/09/2021 रोजी मध्यान काळी 12. वाजता सम्पन्न होत असलेल्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
जेव्हा काळरात्र होऊन सर्वत्र काळोख दाटतो व या काळोखात सकळ प्राणिमात्र चाचपडायाला लागतात, तेव्हा त्या काळोखाचा अंत करण्यासाठी क्षीतीजावर सहस्त्रावधी प्रकाशकिरणांची उधळण करीत सुर्यबिंब उदयाला येते. त्याप्रमाणे आज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला परमेश्वर भक्तीचा प्रकाश देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी बाराव्या शतकात महाराष्ट्रात परब्रम्ह परमेश्वर अवतार. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा उदय (अवतार) झाला.व महाराष्ट्रीय समाज श्रीचक्रधर स्वामींच्या अमृतमय ज्ञानप्रकाशाने उजळून निघाला.
बाराव्या शतकात महाराष्ट्रातील वैदीक धर्म पुरोहीतांनी समाजात चातुर्वण्य व्यवस्थेचे स्तोम माजविले होते .जातीय बंधने कठोर करून तथाकथित शुद्रांना अस्पृश्यांना धर्माची दारे बंद करून गावाबाहेर हाकलून देण्यात आले होते.
स्त्रियांना धर्मग्रंथ आध्ययनाचा, संन्यास घेण्याचा, धार्मिक विधी करण्याचा अधिकार नव्हता.
देवता कर्मकांड व जातीय विषमतेने समाज रसातळाला गेला होता.
अशा वेळी श्रीचक्रधर स्वामींचे महाराष्ट्रात जीव उद्धरण्याच्या हेतूने आगमण झाले.
गुजरात मध्ये भरवस नगरात विशालदेव नावाचा राजा राज्य करीत होता. त्यांच्या पत्नीचे नाव माल्हणीदेवी.त्यांचा सुपुत्र हरीपाळदेव. हा राजपुत्र वयाच्या एकविसाव्या वर्षी अल्पशा आजाराने मृत्यू पावला. त्याचे कलेवर स्मशानात आणले. त्याच वेळेस इकडे द्वारावतीला द्वारावतीकार श्रीचांगदेव राऊळांनी हटयोगिनी कामाख्या निमीत्त आपल्या देहाचा त्याग केला होता. ते परमेश्वरीय परम तत्व मृत हरिपाळ देवाच्या देहात प्रविष्ट झालं.सरणावर ठेवून प्रेताला अग्नी देतेसमयी मृत हरीपाळाचे पतीत उठवून श्रीचांगदेव राऊळ या ईश्वर अवताराने घेतलेला पुनर्वतार म्हणजेच श्रीचक्रधर स्वामी होत.
ऋद्धपूर जिल्हा अमरावती येथे श्रीगोविंद प्रभू हे परमेश्वर अवतार त्याकाळी वास्तव्यास होते .श्रीचक्रधर स्वामींनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या कडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला व त्यांना आपले श्रीगुरू मानले.
श्रीगोविंद प्रभूंनी त्यांना ज्ञानाची दिक्षा दिली व श्रीचक्रधर हे नाव ठेवले. पुढे चालून हेच नाव सर्वत्र प्रचलीत झाले.
स्वामींचे एकांकी परीभ्रमण चालू झाले.सालबर्डीच्या सातपुडा पर्वतावर गेले .मौन धारण करून बारा वर्ष व्यतीत केले. महा तपस्वी मुक्ताबाई त्यांना भेट देऊन स्वामींनी सशास अभयदान देऊन पारध्यांना हिंसा करण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर स्वामी झाडी गोंडवाडा.ओरंगल,आंध्रप्रदेशात गेले .तेथील गोंड आदिवासी लोकांत रमले. त्यांचे एकांकी परीभ्रमण अनेक दृष्टीनै समृद्ध आहे .त्यांच्या या भ्रमंतीच्या आठवणी स्वामींनी वेळोवेळी प्रसंगोपात्त भक्तजणांना सांगितल्या.
श्रीचक्राधर स्वामी साक्षात परमेश्वर अवतार होते, त्यांची वाणी सूमधुर व सूरसाळ होती. त्यांची श्रीमुर्ती बत्तीस लक्षणांनी युक्त व सुंदर होती, त्यांच्या ठायी अपूर्व अशी वेधशक्ती होती. या वेधशक्तीने माणसेच काय पशू-पक्षीही त्यांच्या कडे वेधत.
त्यांच्या निरुपणात त्यांनी
जीव ,देवता,प्रपंच ,परमेश्वर हे चार नित्य पदार्थ सांगितले.
आपल्याला माहिती आहे सुत्रपाठात पंचकृष्ण सांगितले आहेत .यांची ओळख करून देताना श्रीचक्रधर स्वामी म्हणतात. या पाच परमेश्वर अवताराची दास्य भक्ती केली असता हा जीव अविद्या बंधनातून (जन्म मृत्युच्या चक्रातून) मुक्त होऊन कैवल्य पदाची प्राप्ती करवून व कैवल्याचा मोक्ष आनंद उपभोगतो. या विरहीत जे जीव देवतांचे कर्मकांड आचरण करतात ते देवता चक्रात गुरफटून पुन्हा पुन्हा जन्ममृत्युच्या चक्रात सापडून चौकडीचे नरक भोगतात.
श्रीचक्रधर स्वामी परमेश्वर अवतार होते. जीवांना ज्ञान व प्रेम देऊन उद्धार करने हे त्यांचे व्यसन होते. त्यामुळे ब्राम्हण ,क्षत्रिय ,वैश्य ,शुद्र,स्त्री -पुरुष,आदिवासी,गोंड,भिल्ल व सर्व मानव त्यांच्या दृष्टीने एक सामान जीवच होते .म्हणून श्रीचक्रधर स्वामी कुठलाही उच निचतेचा स्पृश्य-आस्पृश्यतेचा भेदभाव न करता सर्व अधिकारी जीवाना ब्रम्हविद्या शास्त्राचे निरोपण करीत होते. स्त्रियांना ,शूद्रांना,अस्पृश्याना ब्राम्हणाच्या पंगतीत बसवून त्यांना समतेचा व बरोबरीचा अधिकार देत होते .
सामाजिक विषमतेने ग्रासलेल्या ब्राम्हण ,क्षत्रिय ,वैश्य ,शुद्र या जातीय उतरंडीमध्ये बंदीस्त झालेल्या सर्व जातीतील मानवाला एकत्र आणून स्वामींनी समतेचा महामंत्र ममतेने शिकविला.
त्र्यंबकेश्वर ,पैठण ,कटक,देवागिरी या कर्मकांडी ब्राम्हणांच्या बलस्थानाला स्वामींनी हादरा दिला.
जोगेश्वरी येथे मातंगाने अर्पण केलेला लाडू स्वीकार केला. एव्हढच नव्हे तर तोच लाडू जवळ असलेल्या आपल्या प्रकांड पंडीत म्हनविना -या कर्मकांडी ब्राम्हण वर्गिय शिष्य वर्गाला प्रसाद म्हणून दिला, मुळात ही घटनाच त्या काळात क्रांतीकारी होती .अस्पृश्य मानल्या गेलेल्या मातंगाचा स्पर्श सुद्धा अपवित्र माणणा-या कडकडीत सोहळ्याच्या ब्राम्हणांना श्रीचक्रधर स्वामीनी केलेला हा व्यवहार फार मोठा देशद्रोह वाटत होता. स्वामींनी मातंगाच्या हातचा लाडू ब्राम्हणांमध्ये प्रसाद म्हणून वाटला.ही घटना ब्रम्हासानू,हेमांड पंडित,महादाश्रम या कर्मठ ब्राम्हणाच्या जिव्हारी लागली .
श्रीचक्रधर स्वामी हे अहिंसेचे मुर्तीमंत प्रतिक होते .एकदा सातपुडा पर्वतावर काही पारधी सश्यांची शिकार करण्यासाठी येतात.तेव्हा स्वामी त्यांना सांगतात,हिंसा करणे पाप आहे त्यामुळे नरक होतात. हा ससा आम्हाला शरण आला आहे आम्ही त्याला मरण देणार नाही .
असेच एकदा मठात इंगळी नीघाली.आउसांनी त्या इंगळीला मारले. हे पाहून स्वामी म्हणतात
तुम्ही महात्मे किं गा.तुम्ही सर्व भुतग्रामा अभय देआवे की!
एकदा भक्तीजणांनी गूंफेसाठी गारी (चिखल) केला. रात्रीतून ती गारी सर्व मुंग्यांनी भरून गेली.स्वामींनी भक्तजणांना दुसरी गारी करायला सांगितली व म्हणाले एथीची सेवा ते भूता अविरोधे करावे किंगा. अर्थात आमची सेवा करताना किडामुंगीची हिंसा होणार नाही याची काळजी घ्या.
श्रीचक्रधर स्वामी सर्वांच्या मताचा सन्मान करीत.एकदा एका भक्ताने अन्य देवतेविषयी अभाष्य केले तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, वैरीयाचा देवो झाला म्हणून काइ दगडे हानोनी फोडावा.
आपला वैरीअसला तरी त्याच्या श्रद्धास्थानाचा सन्मान करावा.
श्रीचक्रधर स्वामी हे सर्वाचा विचार करणारे सहिष्णू वृत्तीचे होते .विरोधकांना सुद्धा ते सन्मानाची वागणूक देत .परधर्म, सहिष्णूता हा त्यांचा स्वभाव होता. महाराष्ट्रामध्ये श्रीचक्रधर स्वामीनी अखंड पाई परिभ्रमण करुन आपल्या सूरसाळ व सूमधूर वाणीने सर्व जाती वर्णातील स्त्री पुरुषाना सत्य धर्माचे सार निरोपण केले.
बाराव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज स्वामींचा चाहता होत गेला.
ख-या अर्थाने पाहू गेल तर सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामिंनी गेले आठशे वर्षा पुर्वीच स्री,शुद्रांना धर्माचा, शिक्षणाचा,समानतेचा, सहिष्णूतेचा अधिकार दिला, हे अघटित कार्य त्यावेळेस केले ज्यावेळेस वर्ण व्यवस्था नांदत होती. स्वामिंच्या अलौकिक ज्ञानाने मोठ मोठे ज्ञानी पंडीत ब्राम्हण स्वामींचे शिष्य बनले, देवगीरीचा (दौलताबाद) महादेव राजा ही स्वामिंच्या दर्शानाला येत असे. स्वामिंनी संसार भयाने त्रस्त झालेल्या शांत बाईसा उपलक्षने अनेकांना दु:ख व्याधी पासुन मुक्त केले. माळी ला सर्पदंश झाला असता आपल्या कृपा प्रसादाने मृत्यू पासुन वाचविले. असे अनेक कार्य करत करत स्वामिंनी अधिकारी जिवांच्या उध्दारा करीता उत्तरा पंथी (उत्तर भारत) जाण्याचा निश्चय केला.
शेवटी भक्तीजणांना ऋद्धपुरी वास्तव्यास आसलेल्या श्रीगोविंद प्रभूच्या सानिध्यात राहण्याची आज्ञा दिली.आणि
आम्ही सांगितलेल्या असतीपरीचे आचरण करून देह क्षेपणा-या साधकांनना आम्ही पुढील जन्मात पुन्हश्च भेट देऊ असे सांगून श्रीचक्रधर स्वामी इ.स.१२७४ मध्ये उत्तरपंथी निघून गेले ते कायमचेच....
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वचनानुसार, आजही महानुभाव पंथीय संत साधक,वासनिक श्रीचक्रधर स्वामिंच्या श्रीचरण स्पर्शाने पवित्र झालेल्या डोमेग्राम ,पैठण,वेरुळ,मेहकर आदि महाराष्ट्रातील अनेक स्थान दर्शनास जाऊन स्थान वंदन करुण अविधी दोष चुकवून पुंन्य प्राप्त करत असतात.
अनंत ब्रह्मांड नायक, परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या श्री चक्रधर ईश्वर भक्ती कडून सर्वांना शुभेच्छा...
जो सर्वदा गुप्त जनात वागे ।
प्रसन्न भक्ता निजबोध सांगे ।।
सद्भक्ती भावाकरीता भुकेला ।
विसरू कसा मी त्या चक्रधराला ।।
जय श्रीचक्रधर स्वामी 🙏
लेखकाचे नाव का गाळले तुम्ही ,,,,
ReplyDeleteखनेपुरीच्या बाबांनी हा लेख लिहिला आहे तुम्ही त्यांचं नाव वगलायला नको होत
दंडवत प्रणाम,दत्त प्रभूंची,व चक्रधर स्वामींची दाही या ऍप मध्ये जोडले तर खूप सुंदर,दंडवत
ReplyDeleteHirabhai mahla
ReplyDeleteदंडवत प्रणाम!
ReplyDeleteDandavat
ReplyDelete