पविते पर्व

दि.21 व 22/08/ 2021 ला पविते पर्व...अर्थात गुरु पूजन सोहळा...

गोविंद... गोविंद...

पविते म्हणजे पवित्र ( पवित्र धागा, जाणवे ) आणि पर्व म्हणजे सण, उत्सव....

श्रावण महिन्यातील पवित्र अशा सणाच्या सर्व अच्युत गोत्रिय परिवाराला हार्दिक शुभेच्छा 

पवीते वाहताना नारळ दोरा सुपारी या वस्तु प्रामुख्याने लागतात.

तर चला मग प्रत्येकाचे महत्त्व समजून घेऊ या.

⚡मग नारळ हे जीव स्वरूपाचे प्रतीेक आहे
⚡दोरा हा जीवाच्या कर्म माळीकेचे प्रतीक आहे. ⚡सुपारी ही मनोधर्म,जीवर्धाचे प्रतीक आहे.

परमेश्र्वराला आपले सर्वस्वच समर्पण करणे हा पविते वाहण्याचा भाव आहे.

गोविंद हा शब्द मुख्यत्वे बोलल्या जातो
तर गोविंद शब्दाचा अर्थ आहे, प्राप्त करून देणारा, म्हणजे पूथ्वीवर, ईंद्रियावर विजय प्राप्त करून देनारा भवसागरातुन मुक्त करनारा
हे कधी होनार ज्या वेळेस आपण आपले सर्वस्व जीवनच परमेश्र्वराला समर्पित करू तेव्हा.

पवित्याला प्रमुख्याने कोणता रंगाचा धागा बांधावा व का?

पवीत्याला पांढरा रंगाचा धागा बांधावा कारण जीव स्वरूप हे स्पटीकासारखे पांढरे आहे व दोरा हा जीवाच्या कर्म मालीकेचे प्रतिक आहे,म्हनुन पांढरा धागा बांधावा तसेच पांढरा हा अहिंसेचे प्रतिक आहे व जाणवे ही पांढरेच बांधावे.
रंगीबेरंगी जे धागे लावले जातात त्या आपल्या भावना होय. ( कमित कमी सफेद व कलर चे मिक्स धागे तरी असावे केवळ कलर चे नसावे. )

जस आपण देवाला पविते वाहिले तसे आपल्या गुरूंना देखील पविते वाहून त्यांचं आपल्या यथाशक्ती पूर्वक पूजन करावे. 

उपदेश गुरु, विद्या गुरु, निमीत्त गुरु, आपल्या पेक्षा ज्ञानाने, अनुसरनाने, चर्येने श्रेष्ठ अशा व्यक्तींच अवश्य पूजन करावे. गुरूंचे पूजन हे कमीतकमी वर्षातून एकदा तरी आपल्या हातुन झालेच पाहिजे. गुरू ही आपली कुपकाटी असते.

स्वामींजी ज्या प्रमाने बीड स्थानी भक्त जनाच्या पवित्याचा स्वीकार केला तसा माझ्या पवित्याचा स्वीकार किजोजी स्वामींराया.
पवीत्या प्रमाणे माझे सर्वस्व जीवन तुम्हा समर्पित केले आहे व करत आहे.

🙏दंडवत प्रणाम 🙏

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान

देवपूजा, वंदन आणि त्याचे महत्त्व

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.