पविते पर्व

दि.21 व 22/08/ 2021 ला पविते पर्व...अर्थात गुरु पूजन सोहळा... गोविंद... गोविंद... पविते म्हणजे पवित्र ( पवित्र धागा, जाणवे ) आणि पर्व म्हणजे सण, उत्सव.... श्रावण महिन्यातील पवित्र अशा सणाच्या सर्व अच्युत गोत्रिय परिवाराला हार्दिक शुभेच्छा पवीते वाहताना नारळ दोरा सुपारी या वस्तु प्रामुख्याने लागतात. तर चला मग प्रत्येकाचे महत्त्व समजून घेऊ या. ⚡मग नारळ हे जीव स्वरूपाचे प्रतीेक आहे ⚡दोरा हा जीवाच्या कर्म माळीकेचे प्रतीक आहे. ⚡सुपारी ही मनोधर्म,जीवर्धाचे प्रतीक आहे. परमेश्र्वराला आपले सर्वस्वच समर्पण करणे हा पविते वाहण्याचा भाव आहे. गोविंद हा शब्द मुख्यत्वे बोलल्या जातो तर गोविंद शब्दाचा अर्थ आहे, प्राप्त करून देणारा, म्हणजे पूथ्वीवर, ईंद्रियावर विजय प्राप्त करून देनारा भवसागरातुन मुक्त करनारा हे कधी होनार ज्या वेळेस आपण आपले सर्वस्व जीवनच परमेश्र्वराला समर्पित करू तेव्हा. पवित्याला प्रमुख्याने कोणता रंगाचा धागा बांधावा व का? पवीत्याला पांढरा रंगाचा धागा बांधावा कारण जीव स्वरूप हे स्पटीकासारखे पांढरे आहे व दोरा हा जीवाच्या कर्म मालीकेचे प्रतिक आहे,म्हनुन पांढरा धागा बां...