एक आदर्श सुवर्णदान - दानविर कर्ण

कुरुक्षेत्रावर सुरु असलेल्या कौरव-पांडवांच्या युद्धाचा तो सतरावा दिवस. 
वेळ जवळ जवळ सुर्यास्ताची. 

कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षांतील योद्धे सारे स्तब्ध उभे होते. समोर जमिनीवर रक्तात न्हाऊन निघालेला महावीर कर्ण मृत्युच्या शेवटच्या घटका मोजत होता. इथे कर्ण मृत्युच्या दारात आणि आसपास सभोवताली पडला होता मृत सैनिकांचा रक्तबंबाळ झालेल्या प्रेतांचा खच ईथे कर्णाचा शेवट पहात उभ्या योध्यांची मुग्ध शांतता आणि चहुकडे फक्त आकांत. त्या सैनिकांच्या आप्त स्वकीयांचा. 
कर्ण आपल्या मावळत्या पित्याला शेवटचा निरोप देत असतानाच त्यांचे लक्ष वेधले गेले एका पित्याच्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे, एका दीर्घ आकांताकडे, एका करुणामयी विनवणीकडे.

"अरे या कुरुक्षेत्रावर कोणी आहे का मला मदत करणारा" युद्धात मुलगा मारला गेलाय माझा. 
त्याच्या अंतिम कार्यासाठीही द्रव्य नाही माझ्याकडे. कोणी आहे का दानवीर. ?

ही मदतीसाठी मारलेली हाक दानवीर कर्णाने ऐकली आणि त्याने त्या याचकास लगेच जवळ बोलावले. त्याला इच्छा विचारली तेव्हा खरे तर त्या याचकास देण्यासाठी त्या क्षणी कर्णाकडे स्वता:हा कडे काहीच द्रव्य नव्हते. पण तरीही कर्णाने आपला दानधर्म हा गुण न त्यागता आपल्या मुलास जवळ बोलावले आणि त्या जखमी स्थितीतही तो म्हणाला,

"माझ्या प्रिय पुत्रा , आयुष्यभर जे मजपाशी होते ते ते सर्व जेव्हा जेव्हा ज्याने मागितले मी त्यास दिले." पण आज हा याचक असाच रिकाम्या हाताने माझ्यापाशी येऊन परत जाणार हे कदापि शक्य नाही. तु एक काम कर, तो पडलेला जमिनीवरचा दगड घे आणि माझ्या तोंडात असलेले हे २ सोन्याचे दात पाड आणि या दुःखी पित्यास दे . त्याच्या मुलाच्या अंतिम संस्कार करण्यासाठी ते त्याच्या कामा येतील.

आपल्या यमसदनी निघालेल्या पित्यासोबत असे निघृण कृत्य करण्यास न धजावणाऱ्या पुत्रास पाहुन शेवटी कर्णाने त्यास तशी आज्ञा केली. 

तेव्हा रडत रडतच दुःखी अंतःकरणाने त्या पुत्राने आपल्या पित्याची ती आज्ञा मानली आणि दगडाच्या घावांनी कर्णाचे तोंड रक्तबंबाळ केले. त्या रक्तवर्णात मोतीमाळेतून अचानक निखळून गळावे तसे २ चमचम करणारे सुवर्णदातही लालसर झाले होते. असे दान कसे दयावे ? हा विचार करत कर्णाने त्यांस आपल्या डोळ्यांपाशी नेले . त्या नयनकमलांतून वाहणाऱ्या अश्रूजलात न्हाऊन पवित्र झालेले ते सुवर्णदान रेशीम कापडाने पुसून घेत हे शेवटचे दान त्या याचकास सुपूर्द करत कर्णाने कायमचे डोळे मिटले.

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू (हिंदी)