नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.
आपण सुंदर सुंदर वस्तु खरेदी करता तेंव्हा लोक कौतुक करतात पण आपले बॅंक खाते रिकामे होत असते. तसेच,

१) आपल्याला उत्तम नरदेह मिळतो
२) प्रतिष्ठित घराण्यात जन्म होतो
३) निरोगी काया प्राप्त होते
४) अनुकूल भार्या मिळते
५) प्रेमळ आई वडील लाभतात
६) जिवाला जीव देणारे सहोदर मिळतात
७) प्रखर बुध्दीमत्ता वाट्याला येते
८) उच्च शिक्षण पूर्ण होते
९) शत्रूनाश होतो
१०) गुणी मुले होतात
११) उत्तम अर्थाजन होते
१२) दीर्घायुष्य लाभते
१३) सत्संगाची प्राप्ती होते
१४) विरोधाविना वाटचाल होते
१५) उत्तम वास्तुसौख्य व वाहनसौख्य लाभते...........

तेंव्हा लोक म्हणतात, "केवढा भाग्यवान माणूस आहे हा"! पण आपल्या आध्यात्मिक बॅंकेतून केवढे पुण्य खर्च होत असते! त्यात पुन्हा भर करायला नको का ? जर पुण्याचा खडखडाट झाला तर संकटे ओढवू लागतात मग तेच लोक म्हणतात, "याला कोणाची तरी दृष्ट लागली." 

म्हणून शहाणी माणसे नित्य उपासना करून आपली पुण्यबॅंक नेहमी भरलेली ठेवतात. परमेश्वराने आपली सारी शक्ती नामात भरून ठेवली आहे. अत्यंत हितकारक असे नामस्मरण करणे याला अज्ञानी लोक "देव देव करतो" असा टोमणा मारतात पण एकदा का करोना व्हायरस संसर्ग झाला की हेच लोक देवाकडे दयेची भीक मागतात. पण खात्यात शिल्लकच नसेल तर मॅनेजर तरी काय करणार? म्हणून भीक मागण्यापेक्षा हक्काच्या कृपेची भिक्षा मागावी. भरपूर रक्कम शिल्लक असेल तर चेक लगेच वटतोच. पुढे पुढे विरक्ती येऊन भक्त रक्कम काढणेच थांबवितो व त्या रकमेची दीर्घ काळची F.D.R. उतारवय सुखकारक करतात.
म्हणून,
 
संपत्ती अथवा विपत्ती l 
कैसीही पडो कालगती l
परी नामस्मरणाची स्थिती l 
सांडोची नये ll

.....दंडवत प्रणाम...

Comments

  1. Japacha mantra send krawa

    ReplyDelete
  2. Ya ghostivr konich mdt krt nahi

    ReplyDelete
  3. दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. लेख फारच.....!
    दंडवत प्रणाम.....!!🙏🙏

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर

    ReplyDelete
  6. फारच सुंदर, दंडवत प्रणाम

    ReplyDelete
  7. खूप सुंदर 🙏दंडवत प्रणाम 🙏

    ReplyDelete
  8. अति सुंदर🙏 दंडवत प्रणाम 🙏

    ReplyDelete
  9. दंडवत प्रणाम 🙏🙏

    ReplyDelete
  10. खूप सुंदर..
    दंडवत प्रणाम 🙏👏👏

    ReplyDelete
  11. दंडवत प्रणाम🙏🙏

    ReplyDelete
  12. दंडवत प्रणाम🙏🏽🌷

    ReplyDelete
  13. Shobhana Dandvat pranam

    ReplyDelete
  14. दंडवत प्रणाम 🙏🙏

    ReplyDelete
  15. अतिसुंदर दंडवत प्रणाम

    ReplyDelete
  16. अंती सुंदर‼️🙏🍀 दंडवत प्रणाम🍀🙏‼️

    ReplyDelete
  17. दंडवत प्रणाम 🙏

    ReplyDelete
  18. दंडवत 🙏🙏🌹प्रणाम

    ReplyDelete
  19. Dandvat pranam Jay Shri Chakradhar🙏🙏🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान

श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू (हिंदी)