श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान

जानोपाध्यांना स्वामी या तिर्थाचे महत्त्व सांगताना म्हणतात, "या स्थानाचे महत्त्व वेगळेच आहे . श्रीदत्तात्रय प्रभूचा नित्यसंबंध आहे. श्रीदत्तात्रेय प्रभू रोज दुपारी प्रत्यक्ष भोजन स्वीकारण्यासाठी येत असतात. 
पूर्वी त्रेतायुगात कुसुमावती नगरीत देवश्रवा नावाचे ऋषी राहत होते. त्यांना आत्मऋषी नावाचा पुत्र होता. देवश्रव्याने अतिशय भावपूर्वक उपासना करून श्रीदत्तात्रेय प्रभूनां प्रसन्न केल्यामुळे ते त्याच्या घरी प्रगट झाले. देवश्रवा श्रीदत्तात्रेय प्रभूच्या भजनपूजनात मग्न असताना त्याचा शिष्य पाचांळराजा आपल्या गुरूच्या भेटीला आला असता त्याला तेथे श्रीदत्तात्रेय प्रभूंचे दर्शन झाले.

देवश्रव्याने अतिशय भावपूर्वक उपासना करुन, विनवुन श्रीदत्तात्रेय प्रभूनां पंचाळेश्वरला आपल्या राजसदनी आणले. पाचांळराजाने श्रीदत्तात्रेय प्रभूनां राजसिहांसनी बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. आणि अनेक प्रकारची स्तुतीस्तवन करुन त्यानीं श्रीदत्तात्रेय प्रभूनां विनंती केली, "हे आर्तदानी भक्तवत्सला माझी सगळी चितां नष्ट करुन माझा पुनर्जन्म चुकवावा."

"हे धर्मशील राजा, आम्हाला तुझ्या हातून काही महत्वपूर्ण कार्य करवून घ्यायचे आहे. त्यानंतर मात्र आम्ही तुला चिरायुपद प्राप्त करुन देवू. तोपर्यंत राज्यवैभवाचा उपभोग घे" असे आश्वासन देवुन श्रीदत्तात्रेय प्रभू तेथून निघून गेले.
त्याच काळात पुलस्ती ऋषींच्या कुभं आणि निकुभं या पुत्रद्वयानीं अतिशय धुमाकूळ घातला होता.( आज ही पान्चालेश्वर जवल राक्षस भुवन नावाचे गाव आहे ) ते कोणालाच जुमेनासे झाले. राजाचां पराभव करुन ते नगरेच्या नगरे उध्वस्त करीत होते. ऋषीमुनीचें तर ते जणु कर्दनकाळच होते.
तेव्हा अंबानगरीत वासतव्यास असलेल्या देवश्रवापुत्र आत्मऋषीला कुभ-ंनिकुंभाची ही दुषकृत्ये पाहुन फार राग आला. ते पंचाळेश्वरास जाउन गाऱ्हाणे करीत पाचांळराजाला म्हणाले, "हे प्रतापसूर्या, तरी तू या राक्षसबंधूचा समाचार घे ."
पाचांळराजाने आत्मऋषीच्यां निवेदनानुसार आणि श्रीदत्तात्रेय प्रभूच्यां आदेशानुसार कुभं-निकुंभाशी घनघोर युध्द करुन त्यानां ठार मारले. जनता व ऋषीमुनी भयमुक्त झाले. परंतु, कुभं-निकुभं दैत्य असले तरी पुलस्ती रुशीचे पुत्र असल्याने आपणास ब्रह्महत्येचे पातक लागले असे पाचांळराजाच्या मनात विकल्प उभा राहीला. 
तेव्हा आत्मऋषीने धावा करुन श्रीदत्तात्रेय प्रभूनां प्रसन्न केले. श्रीदतात्रेय प्रभू तेथे प्रगट झाल्यानंतर पाचांळराजा विनंती करीत म्हणाला, "हे प्रभो, पुलस्तकुलाचे नाश करण्याचे महापाप माझ्या हातून घडले आहे. तरी मला या ब्रह्महत्येच्या दुर्धर पापातून मुक्त करावे."
श्रीदत्तात्रेय प्रभू पाचांळराजाला अभय देत म्हणाले, "राजा, घाबरु नकोस. आम्ही तुला या पातकातुन मुक्त करुन आमचे अक्षयपद प्रदान करु. तरी धनुष्य सज्ज करुन पाताळातून अग्रोदक काढ."

पाचांळराजाने बाण मारुन पाताळातून पाणी काढले. आत्मऋषीने त्या उदकाने श्रीदत्तात्रेय प्रभूचें श्रीचरण प्रक्षाळण केले व ते चरणोदक पाचांळराजास दिले. ते प्राशन केल्याने पाचांळराजा ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला त्यामुळे त्या तीर्थास आत्मतीर्थ असे म्हटले जाते.

पाचांळराजाला पापमुक्त करुन श्रीदत्तात्रेय प्रभु प्रयाण करणार तितक्यात आत्मऋषींनी श्रीदत्तात्रेय प्रभूचें श्रीचरणकमल घट्ट धरुन विनंती केली. "देवाधिदेवा दयासागरा, आपण रोज दुपारचे भोजन आपण या आत्मतीर्थावर येऊन स्विकारावे .माझ्या लेकराचा एवढा लळा पुरवावाजी."
श्रीदत्तात्रेय प्रभु प्रसन्नतापूर्वक ' तथास्तु ' म्हणूण निघून गेले.

आत्मऋषींच्या विनंतीला मान देऊन श्रीदत्तात्रेय प्रभू तेव्हापासून आजतागायत रोज भोजनासाठी आत्मतीर्थी येत असतात. त्यामुळे त्यांच्या नित्यसंबंधाने ते स्थान विशेषच वंदनीय झाले आहे. महानुभाव पंथीयांनाच नव्हे तर आखंड मानव जातीला मनोर्थ पूर्ती करुण,पाप मुक्त करनारे ठरले...

।। दंडवत प्रणाम ।।

Comments

  1. दंडवत प्रणाम ❤️🙇

    ReplyDelete
    Replies
    1. दंडवत

      Delete
    2. दंडवत प्रणाम
      🥹🙏

      Delete
  2. दंडवत प्रणाम

    ReplyDelete
  3. दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी

    ReplyDelete
  4. दण्डवत प्रणाम

    ReplyDelete
  5. दंडवत प्रणाम

    ReplyDelete
  6. ‼️🙏🌷दंडवत प्रणाम🌷🙏‼️

    ReplyDelete
  7. Please upload Bhajans in original voice so we can learn Bhajan... Audio file will also ok...mnje bhajanachi chal samjel.

    ReplyDelete
  8. दंडवत प्रणाम

    ReplyDelete
  9. दंडवत प्रणाम

    ReplyDelete
  10. Dandwat pranam 🙏🙏

    ReplyDelete
  11. दंडवत प्रणाम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू (हिंदी)