उपदेशी नामधारक साधकांचा आचारधर्म


परमार्ग
    परमार्ग हा ईश्वरीचा मार्ग आहे. धर्माची जोपासना व धर्मसंस्कार आश्रमामधुन केले जातात. आश्रमामध्ये देवाची आराधना,नामस्मरण, विधी अखंड चालु असतो. तेथील संतांचा ईश्वराला अभिमान असतो म्हणुन आपण आश्रमांमधे गेल्यानंतर तेथील साधुसंतांशी प्रेमाने वागुन आदर केला पाहीजे. आपण कोणाही संतांचा अपमान करू नये त्यांचे मन दुखवू नये. असे केल्याने घोरनर्क भोगावे लागतात. सर्व साधु संतांच्या सहवासात असावे त्यांचे तन मन धनाने भजन पुजन करावे. हे त्या मार्गातील हे या मार्गातील (कपड्यांवरून) असा भेदभाव करु नये, असे केल्याने देवाला थोर खंती येते म्हणुन याची काळजी घ्यावी. 
    ज्योतिष इतर शास्त्राचे नियम पाळू नये तसेच तंत्र मंत्रसुद्धा करू नये गंडेदोरे, खड्याचा अंगठ्या बांधू नये
छु छा यांचा मागे लागु नये कारण आपण जे सुख दु:ख पाप जोडले असेल ते तर भोगावेच लागेल. 
    आपल्या कर्माने जे दु:ख प्राप्त झालेले आहे ते सर्व दुःख दुर करण्यासाठी परमेश्वराचेच स्मरण व प्रार्थना करावी. 
आपले दुःख इतरांना सांगत फिरु नये ज्योतिषांना आपला हात दाखवु नये. आपल्या देवा व्यतिरिक्त इतर कुणाही देवतेला शरण जाऊ नये.
    आपल्यावर साधु संतांचा आशीर्वाद आणि त्यांचे शुभचिंतन राहिल असे वर्तन करावे त्यांच्या प्रसन्न मनोधर्माने सुद्धा दुःख दुर होते. 

स्मरण विधी 
पहाटे लवकर उठुन दंडवत घालुन उत्तरेकडे तोंड करून पटकरवर शांत बसावे. पाच नामाच्या पाच गाठ्या स्मरण करावे तसेच पाचवे नाम निरंतर स्मरावे म्हणजे उठता बसता जेवता झोपता देवाला आठवावे. कुठलेही फोटो व चित्र पाहु नये त्यांचे ध्यान करु नये यामुळे विकल्प हा मोठा दोष लागतो. म्हणुन प्रतिमा पुजन निषेध सांगितले आहे. 
संध्याकाळी ही पाच गाठी स्मरण करूनच झोपावे. वेळात वेळ काढून शास्त्राभ्यास करावा. महत्वाचे म्हणजे  वयाचा छप्पनीचा (५६) आत संसाराचे योग्य नियोजन करून अनुसरण घ्यावे अशी देवाचीच आज्ञा आहे. 

मार्गात जातांना 
    मार्गात जातांना मार्गाच्या किंवा आश्रमाच्या गेटवरच उतरावे. ज्ञाता समोर उठबैस करतांना पादत्राणे घालु नये किंवा घालुन फिरू नये. प्रथम तेथील प्रमुखांना दोन दंडवत घालुनच भेटकाळ करावा मार्गात उचित सेवा व्यापार करावा मात्र हे करताना तेथील प्रमुखांना विचारूनच सेवा व्यापार करावा मनाला पटेल तसं करू नये.. मार्गात किंवा घरी भोजन करतांना उष्टे टाकु नये. अन्न वाया जाऊ देऊ नये कारण ते भिक्षेचे अन्न असते. मार्गातुन जातांना व निघतांना सर्वांना दंडवत प्रणाम करावा मार्गातुन निघतांनाही सर्वांना दंडवत करावा. आपण मार्गाला खाऊ घालावे आपण मार्गाचे दानाचे अन्न ईतरांना खाऊ घालु नये. आपल्या गाडीचा ड्रायव्हर आणि इतर मित्र मंडळी यांची खाण्या पिण्याची व्यवस्था बाहेर करावी. कारण जर त्यांना मार्गातच खाऊ पिऊ घातले तर मार्गाला अन्य भजनाचा दोष लागतो. मार्ग प्रमुखांनी दिलेला प्रसाद घ्यावा. आपल्या सेवेमुळे त्यांचा अनमोल वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. मार्गाचे दोष पाहु नयेत कारण आपणच रज तमाने भरलेलो आहोत. आपल्या ठिकाणी ४८ प्रकारचा गर्व  आणि  साडे बासष्ठ हजार दोष आहेत अनेक दोषांनी आपण भरलेलो आहोत म्हणुनच दोष न पाहता फक्त गुणच ग्रहण करावा. हे दोष कमी करण्याचाच प्रयत्न करावा. हा आपला तो परका असा भाव मनात ठेऊ नये.
मार्गातील आपल्या पंगतीला दोन चार लोकांनीच जावे जेणेकरून मार्गाला आपल्या मुळे त्रास होईल. तसेच स्थान प्रसाद मार्ग भेटीसाठी कोणालाही आग्रह करू नये. मार्गात पुरुषांनी महिला विभागात जाऊ नये. मार्गात नटूनथटून जाऊ नये. जातांना साध्यासुध्या कपड्यात रंकवृत्तीने सुदाम्याप्रमाणे जावे किंवा तसे वर्तन करावे. तरच स्थानावर किंवा मार्गात जाण्याचा लाभ होईल  विड्याचे नारळ परत मागु नये साधुंनी प्रसन्नतेने दिले तरच घ्यावे. साधु संताचा पवित्र निढळाचा पैसा त्यांच्याकडे मागुन आपल्या संसारात वापरू नये.कारण त्यामुळे आपणांस दरीद्रता प्राप्त होते.
मार्गातील आपल्या नातेवाईक असलेल्या भिक्षुकांशी घरगुती व अन्य वार्ता करू नयेत. केवळ धर्मवार्ताच करावी. 
तसेच तपस्विनी माता भगिनी सोबत अल्पकाळच धर्मवार्ता करावी व त्वरीत विभाग करावा. जातांना मार्गाचे गुण आठवित जावे किंवा मौन जावे.  मार्गात जेव्हा संत विश्रांती करत असतील तेव्हा आपण रचमच करू नये. त्यांची निद्रा भंग करू नये शांततेचे वर्तन करावे. सर्वांशी प्रिय बोलावे. चतुर्विध साधनांवर श्रद्धा भाव ठेवल्याने परमेश्वर प्रसन्न होतात व परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी या चारही साधनांची आवश्यकता आहे. आपल्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा पत्रिकेत पंचावताराचे फोटो किंवा वचनही छापु नये. आपले आत्मकल्याण आपणच करून घ्यावे कारण जो देवाचे म्हणितले करेल त्याचाच देवधर्म आहे इतरांचा नाही जेथे देवधर्म आहे त्याचाच जय आहे. आपण ज्या मार्गात स्थानावर गेलो ज्यांचा संगसांगाती राहिलो, ज्या साधुंना भेटलो तेथे त्यांचेच गुणवर्णन करावे इतरांचे गुणवर्णन तथा दोष वर्णन करू नये.  याप्रमाणे आपण आपले वर्तन ठेवावे.

    आपल्याकडुन कळत न कळत अनेक दोष जोडले जातात ते ह्या निरोपणामुळे दुर होतील किंवा तसा दोष न जोडण्याचा प्रयत्न राहील. अश्या अयोग्य जीवांना योग्य करण्याचे काम हे निरोपण करत आहे. म्हणुनच प्रायश्चितात म्हटले आहे की.., 

जय भगवंता शुद्ध केवळ जयतु सुखदानी |
अयोग्य जीवा योग्य करीसी अजब ही करणी ||

 दंडवत प्रणाम

Comments

  1. देव करण्याच्या आधी जेव्हा आपण अज्ञान होतो तेव्हा झालेलं चूक किंवा पाप देव नष्ट करतो का

    ReplyDelete
    Replies
    1. अज्ञान असताना केलेल्या चुका, सज्ञान झाल्या नंतर ईश्वरा कडे आणि आपल्या गुरु निमित्ता कडे प्रयचित्त करून नक्कीच दुरुस्त करता येतील, आणि ईश्वर सुद्धा दयाळू आहेत ते नक्कीच प्रामाणिकतेने केलेल्या क्रियेचा स्वीकार करतात....

      Delete
  2. धन्यवाद. दंडवत प़णाम

    ReplyDelete
  3. संपुर्ण प्रचित असायला पाहिजे सर्व दोष उक्त जसेकी 1विकार दोष 2विकल्प दोष 3हीन दोष 4गहाळ दोष 5जय बविसा दि दोस मी आपणास विनंति करतो

    ReplyDelete
  4. दंडवत प्रणाम 🙏🌷

    ReplyDelete
  5. DANDWAT PRANAAM SWAAMI Prabhu

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू (हिंदी)