अक्षयतृतीयेला लाहामाइसाच्या क्रियेचा स्विकार
अक्षयतृतीयेला लाहामाइसाच्या क्रियेचा स्विकार
अक्षयतृतीयेच्या दिवशी लखुबाईसांनी स्वामींना विनंती केली ," जी,जी,मी सर्वज्ञांच्या ठिकाणी अक्षयतृतीया करीन . स्वामींनी लखुबाईसांची विनंती स्विकारली .
लखुबाईसांनी उपहार केला. सर्वज्ञांना तेल,उटणे लावून आंघोळ घातली.पूजावसर केला, ताट तयार केले,स्वामींचे जेवण झाले गुळुळा केला, पानांचा विडा दिला.
सर्वज्ञांना घागरीत काही वेगवेगळे पदार्थ भरुन दिले ते पाहून लाहामाईसा दु:ख करु लागल्या 'ही लखुबाइसा दैवाभाग्याची . हिने सर्वज्ञानच्या ठाइ अक्षयतृतीया केली. मी दुर्दैवी माझ्या जवळ काहीच नाही, असे म्हणून दु:ख करु लागली. तेव्हा सर्वज्ञांनी लाहामाईसाला विचारले बाई, यांनी आमच्या ठायी अक्षयतृतीया केली . तुम्ही का करत नाही?
लाहामाईसा स्वामींना म्हणतात ,जी,जी,मजजवळ तर काहीच नाही? मग सर्वज्ञांनी सांगितले ," ही घागर घेऊन जा आतबाहेर धुवा.खोल पाण्यात बुडवून भरा व आम्हाला द्या. "मग आम्ही तुमची अक्षयतृतीया संपूर्ण चरितार्थ करु, "लाहामाइसा पटकन हो जी म्हणून घागर घेऊन गंगेला गेल्या आत बाहेर घासून स्वच्छ धुवून खोल पाण्यात बुडवून भरुन आणली व सर्वज्ञांना समर्पित केली.स्वामींनी चर्या क्रियेचा स्विकार केला व म्हटले, "बाई, आम्ही तुमची अक्षयतृतीया संपूर्ण चरितार्थ केली हो."
धन्य त्या लहामाइसा त्यांच्या जवळ काहीच नव्हते पण ह्रदयातून मनोभावे स्वामींच्या ठायी काही तरी करायची तळमळ स्वामींनी जाणली व त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग दाखविला उपाय सुचवला आपणही हीच तळमळ ठेवून अंत:करणं पूर्वक स्वामींच्या ठायी आपली क्रिया केली तर सर्वज्ञ ती नक्कीच स्विकारतील .
लहामाइसा व लखुबाईसांच्या अक्षयतृतीये निमित्ताने केलेल्या क्रियेचा स्वामींनी प्रसन्नतेने स्विकार केला तसाच आपल्या ही क्रियेचा स्वामींनी प्रसन्नतेने स्विकार करावा ही तळमळ ठेऊयात.....
दंडवत प्रणाम
जय श्री चक्रधर स्वामी मंदिर श्री क्षेत्र डोमलगाव
ReplyDelete