श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान
जानोपाध्यांना स्वामी या तिर्थाचे महत्त्व सांगताना म्हणतात, "या स्थानाचे महत्त्व वेगळेच आहे . श्रीदत्तात्रय प्रभूचा नित्यसंबंध आहे. श्रीदत्तात्रेय प्रभू रोज दुपारी प्रत्यक्ष भोजन स्वीकारण्यासाठी येत असतात. पूर्वी त्रेतायुगात कुसुमावती नगरीत देवश्रवा नावाचे ऋषी राहत होते. त्यांना आत्मऋषी नावाचा पुत्र होता. देवश्रव्याने अतिशय भावपूर्वक उपासना करून श्रीदत्तात्रेय प्रभूनां प्रसन्न केल्यामुळे ते त्याच्या घरी प्रगट झाले. देवश्रवा श्रीदत्तात्रेय प्रभूच्या भजनपूजनात मग्न असताना त्याचा शिष्य पाचांळराजा आपल्या गुरूच्या भेटीला आला असता त्याला तेथे श्रीदत्तात्रेय प्रभूंचे दर्शन झाले. देवश्रव्याने अतिशय भावपूर्वक उपासना करुन, विनवुन श्रीदत्तात्रेय प्रभूनां पंचाळेश्वरला आपल्या राजसदनी आणले. पाचांळराजाने श्रीदत्तात्रेय प्रभूनां राजसिहांसनी बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. आणि अनेक प्रकारची स्तुतीस्तवन करुन त्यानीं श्रीदत्तात्रेय प्रभूनां विनंती केली, "हे आर्तदानी भक्तवत्सला माझी सगळी चितां नष्ट करुन माझा पुनर्जन्म चुकवावा." "हे धर्मशील राजा, आम्हाला तुझ्या हातून काह...