देवाची प्राप्ती कोणाला होते
एक राजा होता, सद्भक्त होता,त्याला देव प्रसन्न झालें, देव म्हणालें, राजा तुला जे हवे ते माग. राजा प्रजेच्या हिताचा विचार करायचा, त्यांच्या सुखी जीवनाचा विचार करायचा म्हणाला देवा जसे आपण मला दर्शन दिले तसे राज्यातील प्रत्येकाला दर्शन ध्या म्हणजे सारे सुखी होतील. देव म्हणाले राजा हे असंभव आहे प्रत्येकालाच देव हवा आहे असे नसते, पण राजा प्रजेचे हित पाहणारा होता त्याने हट्टच केला, देव म्हणाला ठीक आहे समोरच्या डोंगरावर सर्वांना घेऊन ये मी दर्शन देईन . राजाला खूप आनंद झाला, दुसऱ्या दिवशी साऱ्या प्रजेला घेऊन डोंगराकडे निघाला. चालता चालता लोकांना एके ठिकाणी तांब्याची नाणी दिसली काही लोक ती जमवू लागली, राजा म्हणाला अरे यापेक्षा महत्वाचे आपणाला भेटणार आहे चला माझ्याबरोबर पुढे चला पण त्यानी राजाचे ऐकले नाही, राजा इतरांना घेऊन पुढे निघाला तर पुढे चांदीची भरपूर नाणी दिसली आणि काही लोक तिकडेच धावले त्यांनी असा विचार केला पहिले चांदीची नाणी घेऊ मग देवाला भेटू देव कुठं जातोय? राजा म्हणाला त्या चांदीच्या नाण्यासाठी नशिबाला लाथ मारू नका पण कोणच ऐकायच्या मनस्थिती नव्हते प्रत्येक जण नाणी ज...