Posts

Showing posts from August, 2022

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!!

Image
उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला.. नमन असो माझा त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला....  ७५, व्या अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या श्री चक्रधर ईश्वर भक्ती ग्रुप कडून आपण आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!.. 💐🙏🇮🇳 आमचे स्वामी श्री चक्रधर स्वातंत्र्याचं महत्व सांगत असतांना म्हणतात "स्वातंत्र्य हा मोक्ष,पारतंत्र्य हा बंध" कोणत्याही बाबतीत स्वातंत्र्य हे महत्वाचे असणं गरजेच आहे मग ते धर्म आचरन्याच्या बाबतीत असो वा दैनंदिन जीवनात असो स्वातंत्र्य हे महत्वाचे.  दंडवत प्रणाम...🙏🌹

पविते पर्व - अर्थात एक पवित्र विधी...

Image
स्वामींच्या सन्निधाना पासून ते आज पावेतो पविते पर्वकाळ हा पवित्रविधी महानुभाव पंथात चालत आलेला आहे. पविते पर्वाच एक आगळ वेगळ वैशिष्ट्य आहे, पविते अर्पण करणे म्हणजे हा पवित्र विधी अर्थात आपल्या श्रेष्ठ व्यक्ती, गुरु जनांन प्रती आदर व्यक्त करणे होय. येणे करुन आपल्याही चित्ताची शुध्दता व मनाला पवित्रता प्राप्त होते. सर्व आश्रमा मधे हा सोहळा दिवाळी सना प्रमाणे मोठ्या हर्षोल्हासात संपन्न होत असतो. श्री गुरुजींची पालखी मधून काढलेली सवाद्य अशी भव्य शोभा यात्रा. श्री गुरुंना पूजन विधी साठी केलेले ते भद्रासन, पुजेची केलेली आरास. सर्व परिसर रोषणाई ने सजलेला. श्रीगुरुंच्या ठिकानी श्रध्देने व स्वकष्टाने बनविलेले वेगवेगळ्या प्रकारचे नक्षिकाम केलेले पवित्याचे नारळ. सर्व गुरुबंधु, संत-तपस्विनी,वासनिक वर्ग आपल्या मनामधे एक पवित्र भावना घेऊन श्रीगुरुंच्या भेटीला आलेले असतात. सर्व गुरुबंधु श्रीगुरुंना भेट व पविते अर्पण करण्यासाठी आलेले असल्यामूळे सर्वांची एकाच ठिकानी होणारी अपुर्व व प्रेमळ अश्या भेटीचा योग. सर्व कसं आनन्दमय वातावरण असत. म्हणून म्हटलं आहे ना " आनंदाचे डोही आनंद तरंग...