श्री दत्तात्रेय प्रभूंचे चोवीस गुरू

श्री दत्तात्रेय प्रभूंचे चोवीस गुरू



1) पृथ्वी
गुण - सहनशीलता
पृथ्वीप्रमाणे सहनशील आणी द्वंद्वसहिष्णू असावे.
 
२) वायु
गुण - विरक्ती
वारा थांबत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तुला मोहित होऊन आपले व्यवहार थाबवू नये.
 
३) आकाश
गुण - अचलता
आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा , नि:संग , अभेद , निर्मळ , निर्विवाद , अलिप्त आणि अचल आहे।

४) जल
गुण - स्नेहभाव
मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वा समवेत स्नेहभावाने वागावे. कोणाचाही पक्षपात करू नये.
 
५) अग्नि
गुण - पवित्रता
मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशीत व्हावे.

६) चन्द्रमा
गुण - विकार बाधा न होणे
ज्या प्रमाणे चंद्राच्या कलेत उणे - अधिकपणा असुन त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही. त्या प्रमाणे आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत.
 
७) सुर्य
गुण - निपक्षपातीपणा
सुर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तुचा संचय करून परिस्थिती लक्षात आणुन निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्यांचा लाभ द्यावा पण त्यांचा अभिमान बाळगु नये.
 
८) कबुतर
गुण - अलिप्तता
जसा बहिरीससाणा कबुत्तराला परिवारासहित भक्षण करतो. तसे जो संसारात आसक्त राहणार्यांचा काळ भक्षण करतो. यास्तव मुमुक्षुने या सर्वांपासुन मनाने अलिप्त असावे.
 
९) अजगर
गुण - निर्भयता
अजगराप्रमाणे मुमुक्षुंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करुन प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरुपी लय लावून बसावे.
 
१०) समुद्र
गुण - परोपकारी
समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहुन सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होवू नये किंवा दु: ख कोसळल्याने दु:खी होवू नये. सदैव आनंदी असावे.
 
११) पतंग
गुण - मोह त्याग
ज्या प्रकारे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो त्याचप्रमाणे स्त्री विलासाकरता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो.

१२) मधमाशी
गुण - धनसंचय त्याग
ज्या प्रकारे मधमाशी कष्ट करून मध साठवते परंतु त्याचा उपयोग स्वतः करता न करता इतरांना उपयोग होतो, त्याचप्रमाणे धनसंचय करुन परीवार व इतरांच्या उपयोगी लावुन,धर्म कार्यासाठी खर्ची लावावा. 

१३) हत्ती
गुण - काम विकाराला वश करणे
हत्ती बलवान असला तरी त्याला वश करण्यासाठी काष्ठाची एक हत्तीनीमुळे तो खड्ड्याय पडतो. त्याचप्रमाणे स्त्री सुखात भुलणारा पुरूष त्वरीत बंधनात येवून पडतो.

१४) शहद काढणारा भ्रमर
गुण - विषयात न अडकणे
सुर्य विकासी कमळे सुर्य मावळताच मिटतात.अशा वेळी भ्रमर त्या वर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून विषया सक्तीने बंधन प्राप्त होते. हे जाणुन विषयात आसक्ती बाळगु नये.

१५) हरीण
गुण - मोह त्याग
पवना प्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधूर गायनाला लुब्ध होवून आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही छंदा मधे अडकु नये.

१६) मीन
गुण - चवीत न गुंतणे
लोखंडाच्या गळाला बांधलेला मांस पाहुन भुलल्यामुळे मासा तो गळ गिळल्यामुळे प्राणास मुकतात.त्या प्रमाणे मनुष्य जिव्हेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म - मरणरुपी भोवऱ्यात गोते खात रहातो.

१७) पिंगळा
गुण - आशेचा त्याग
एके रात्री बराच वाट बघीतल्यावरही एकही पुरूष पिंगळा वेश्येकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले अंगी आशा प्रबल असल्याने सुखनिद्रा लागत नाही, म्हणून आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात एकही दु:ख बाधत नाही.

१८) टिटवी
गुण - आस्कती त्याग
चोचीत मासा धरुन चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणी घारी तिच्या मागे लागतात.तिला टोचा मारतात. पाठलाग करतात. शेवटी ती मासा टाकून देते.

१९) बालक
गुण - आनंदी
जग हे प्रारब्धाधीन समजुन मानापमानाचा विचार न करता सर्व चिंतेचा परिहार करून बालका प्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा.

२०) कंकण
गुण - वाद विवाद
दोन बांगड्या एकावर एक आपटुन त्याचा आवाज होतो त्या प्रकारे दोन माणसे एकत्र राहील्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र वास करत असल्यास कलह होतो .म्हणून ध्यान योगादी करणाऱ्याने निर्जन प्रदेश शोधुन एकटे राहावे.

२१) कारागीर
गुण - एकाग्रता
एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. त्याच्या जवळ राजाची स्वारी वाजतगाजत थाटात गेली. त्याकडे त्याचं लक्ष नव्हते, नंतर त्यातील एकाने त्याला विचारले राजाची स्वारी बघीतली का ? तो बोलला नाही....

२२) सर्प
गुण - सावधता
दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत.सावधपणे फिरतात. तद्वत साधकाने सावध राहुन एकत्र राहु नये.

२३) कोळी
गुण - ईश्वरेच्छा
ज्या प्रकारे कोळी घर बनवतो मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो तसाच ईश्वर इच्छामात्रेकरून जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो. म्हणून जगातील घटनांना महत्व देवू नये.

२४) भ्रमरकीट
गुण - ईश्वरस्वरुपता
भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वत: भ्रमरपणाला पावतो तसाच एकनिष्ठपणाने परमात्वतत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मरूपास पावतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू (हिंदी)