श्रीमदभगवद्गीता
जय श्रीकृष्ण
आज गीता जयंती आहे.त्यामुळे एक धर्मविचार आपल्या सर्वांना सांगत आहोत.
आजच्या माणसाला विसर पडत चाललाय तो आपल्या संस्कारांचा.
"श्रीमदभगवदगीता"
आम्हां भारतीयांचा श्वास असलेला हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक धर्मग्रंथ आहे.
त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निमित्य करुन संपुर्ण मानवजातीलाच जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
आपण सर्वच भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवुन शपथ घेण्याची पध्दत आहे. प्रत्यक्षात हा ईश्वरीय तत्वज्ञानाचा अत्यंत पवित्र असा धार्मिक ग्रंथ आहे आणि त्यामुळे तो पवित्र आहे.
जगाचा एकमेव धर्मग्रंथ म्हणुन आपल्या या धर्मग्रंथाची इतिहासात नोंद झालेली आहे.
इतिहासातील अनेक शुरविरांनी यातील कथा ऐकुन भारतीयांना स्वातंत्र्य मिळवुन दिलेले आहे.
अनेक महापुरुषांनी यावर अभ्यास केला आहे.
"गीताई" हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे.
व लोकमान्य टिळकांनी सुध्दा तुरुंगामध्ये असताना यावर अभ्यास करुन "गीताग्रंथ" लिहीला आहे.
त्याकाळी शत्रुंची आक्रमण अनेक संकट असायची तरीही माणसं या ग्रंथावर अभ्यास करायची .
लोकमान्यांनी अंधार्या तुरुंगात राहुन ,शिवरायांनी गड किल्ल्यावरील अंधार्या रात्रीत अनेक संकटांना तोंड देत या आमच्या श्रीकृष्णांच्या कथा व गीता ग्रथांचा अभ्यास केला .
पण आज दुर्दैव एसी रुम व सर्व सुखसोयी युक्त असलेल्या अलिशान बंगल्यात असुनही आम्हांला साधा एखादा श्लोकही तोंडपाठ नसावा हे आमचे दुर्दैव आहे .पण काही ठीकाणी आज ऊलट याचाच अपमान होऊ लागलाय हे पाहुन कुठेतरी मनाला ठेस लागुन ती सतत सलत राहतेय. याचं खुप वाईट वाटतेय.
आमचा धर्मग्रंथ कसा आहे त्याची ओळख आंम्हाला माहीत असायलाच हवी.
"श्रीभगवत्गीता" हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो.
सामान्यजनांमध्ये "श्रीभगवत्-गीता" "गीता"या नावाने ओळखली जाते.
कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञानयोग,कर्मयोग,भक्तीयोग, यांबद्दल महत्वपुर्ण मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
"श्रीभगवद्गीतेत" असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला मी देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णांनी असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाही दाखविले आहे!)
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की या गीतेचे पारायणही अनेकजण करत असतात.
गीतेतील ज्ञानामुळे व त्या गीतेच्या पारायणामुळे तसेच श्रध्दापुर्वक आवर्तन व एखादा श्लोक जरी श्रध्देने श्रवण केला तर या जीवाची अनंत पापे नष्ट होतात व सर्व श्लोक अत्यंत श्रध्देने ऐकले व वाचले तर कितीतरी अनंत जन्माची घोरपापे पण नष्ट होतील.
त्याचप्रमाणे या गीतेच्या श्रवणाने माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' ही म्हणले गेले आहे.
या अठरा अध्यायांत मिळून अर्जुनासाठी केवळ ‘युध्द कर’ एवढाच उपदेश नाही.तर चारी वर्णांसाठी स्वभाव धर्माप्रमाणे नियोजित असलेली आपआपली चांगली अहींसा जनक कर्मे करावीत.व ईश्वरावर नितांत भक्ती आणि विश्वास ठेऊन, निरिच्छबुध्दीने, म्हणजे फलाची आशा न धरता कर्म करणे. आणि, ‘हे सर्व कर्म मी त्या परमेश्वरासाठी करतो आहे’ ही भावना बाळगून केली तर त्या त्या कर्मात असलेल्या व नसलेल्या सर्व दोषांचे आपोआपच निवारण होते. किंबहुना कर्मे करणार्याला जरी ती तो स्वत: करतो आहे असे वाटत असले तरी ती सारी त्या परमेश्वराच्या प्रेरणेवरून घडत असतात. त्यामुळे कर्म करणेच नको अशी भावना धरून निष्कर्मी रहाणे अथवा कर्मसंन्यास घेणे हे व्यर्थ आहे.म्हणुन चांगले म्हणता आले नाही तरी चालेल पण त्या परमेश्वराच्या या गहन शास्त्राला नकळतही नावे ठेवल्यासारखे होईल असे वागु नये. त्यामुळे आपणच आपला नाश होईल म्हणून तसे करणे टाळावे.
कारण परमेश्वर तर दयाळु,मयाळु,कृपाळु,कनवाळु आहेत ते काही वाईट करणार नाहीत पण ईश्वराचे सेवक आहेत देवीदेवता हे मात्र त्या जीवाला अनुशासन करतीलच. कारण हे शास्त्र जीवाच्या कल्याणाकरताच सांगितलेले आहे पण आज दुर्देवाने काही लोक त्याला नावे ठेवत आहेत.
आपण तसे न करता परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे
फलाची अपेक्षा न धरता नियोजित कर्मे करून ईश्वराची भक्तीपूर्वक आराधना केली पाहीजे तरच मनुष्याला पुनर्जन्म मरणाच्या व या दुःखातुन,नरकातुन या फेर्यातून मुक्ति मिळेल.
असे हे ब्रम्हज्ञान स्वत: भगवान श्रीकॄष्णांनी कुरूक्षेत्रावरील महाभारतयुध्दाच्या निमित्ताने अर्जुनाला दिले. त्याला युध्द करण्याने आपणच आपल्या आप्तजनांचा संहार करणार असल्याबद्दलची जी शंका होती ती स्वत:च्या परमेश्वराच्या या विराट स्वरूपाचे दर्शन दाखवून आणि तो संहार अर्जुन नव्हे तर आपण स्वत:च करीत असल्याचे स्पष्ट करून निवारण केली आणि अर्जुनाच्या मनावर आलेले मोह आणि अज्ञानाचे सावट दुर करून त्याला त्याचे क्षत्रियाकडुन अपेक्षित असे असलेले युध्दकर्तव्य पार पाडण्यास प्रवॄत्त केले.
हे सारे ज्ञान संजय, आपल्या दिव्यचक्षुंनी कुरूक्षेत्रावरील घटनाक्रम बसल्या जागेवरून समक्ष पाहु शकत होता.
असे हे परम पवित्र ज्ञान आपण हिंदुंनी ते जोपासले पाहीजे.तरच धर्म टिकेल व वाढेल.
नाहीतर सर्वीकडे अज्ञान,अंधश्रध्दा माजेल. व कालांतराने ऊद्या आपल्याच मुला बाळांना असुरक्षित जीवन जगावे लागेल.
आज अत्यंत तळमळीने सांगावेसे वाटतेय आज आपल्या धर्माची जोपासना व वाढवृध्दीची जबाबदारी आपल्यावर आहे.
"हा जन्म ही वेळ पुन्हा होणे नाही"
दंडवत प्रणाम 🙏
Comments
Post a Comment