ईश्वर अप्राप्ती

ईश्वर परमार्गात असूनही ईश्वराचे ज्ञान नाही अशा जीवाला परमेश्वर प्राप्त होत नाही याविषयी दुःख करणे हे प्रयासाने लाभते.कारण जिथे ज्ञान आहे तिथे वैराग्य नसते व जिथे वैराग्य आहे तिथे ज्ञान नसते. कोणासाठी वैराग्य करावे किंवा कोणासाठी जन्म वहावा याचे जर ज्ञान नसेल तर ते वैराग्य व्यर्थ आहे.म्हणून अज्ञान जीवाला परमेश्वर प्राप्त होत नाही व याविषयी दुःख करणे प्रयासाने लाभते.म्हणजे ईश्वर अप्राप्तीचे दुःख करणेसाठी सुध्दा त्याला प्रयत्न करावा लागतो.म्हणून ज्ञान जर असेल तर निश्चित्तच परमेश्वर त्याला लवकर प्राप्त होतात. ईश्वर अप्राप्तीचे दुःख करणे दुर्लभ का आहे तर सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात , प्रपंचातील विषयात रममाण असणारा जीव ईश्वर अप्राप्तीचे दुःख तर करतच नाही परंतु मी करील अशी उत्कठ इच्छा सुध्दा त्याच्या मनामध्ये येत नाही.जीव जसे प्रपंचातील आप्तस्वकीय नातेगोते यांचेसाठी रडतो तसे ईश्वर अप्राप्ती म्हणून रडत नाही. जीवाने मला परमेश्वर भेटावा, प्राप्त व्हावा असे अप्राप्तीचे दुःख केले पाहिजे परंतु असे दुःख जीवकडून होत नाही.म्हणून जीवाला जर ज्ञान असेल तर निश्चितच त्याला ईश्वर अप्...