महानुभाव पंथातील व्रतवैकल्ये व विधी
मुळात आपल्या पंथाला व्रतवैकल्ये या शब्दाचेही वावडे आहे. आणि इतर उपासना पंथामध्ये जसे व्रतवैकल्ये असतात तशी या पंथामध्ये नाहीत. परंतु पंथ सुरळीत चालावा, उपासना अखंड असावी या करिता काही क्रिया श्रीचक्रधरांनी अनुयायांसाठी आचारावयास सांगितल्या त्याला 'विधि' असे म्हणतात. ज्या क्रिया आचारायलाच हव्या त्याला 'विधि' तर ज्याचे आचरण निषिद्ध आहे त्याला 'निषेध' असे म्हणतात. सामान्यपणे लीळाचरित्रात जसे सांगितले आहे तसे आचरण करणे अभिप्रेत आहे. जे त्याप्रमाणे वागतात त्यांना अनुसरला असे म्हणतात. या पंथामध्ये जे संन्यस्त अनुयायी आहेत. त्यांच्यासाठी कडक विधि आहेत. हे विधी दोन प्रकारचे आहेत. १) नित्य विधी २) निमीत्त विधी नित्य विधी खालीलप्रमाणे आहेत १] अटन २] विजन ३] भिक्षा ४] भोजन ५] स्मरण ६] प्रसादसेवा ७] निद्रा 'हे सात नित्य विधी एकांकी व बहुतांच्या सांगाती असताही करावे.' असे सांगितले आहे. हे विधी नित्य नेमाने करावे असे सांगितले आहे. या सात नित्य विधीं...