जिवोध्दारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन

जिवोध्दारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी वर्ष दिनांक 08/09/2021 रोजी मध्यान काळी 12. वाजता सम्पन्न होत असलेल्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... जेव्हा काळरात्र होऊन सर्वत्र काळोख दाटतो व या काळोखात सकळ प्राणिमात्र चाचपडायाला लागतात, तेव्हा त्या काळोखाचा अंत करण्यासाठी क्षीतीजावर सहस्त्रावधी प्रकाशकिरणांची उधळण करीत सुर्यबिंब उदयाला येते. त्याप्रमाणे आज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला परमेश्वर भक्तीचा प्रकाश देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी बाराव्या शतकात महाराष्ट्रात परब्रम्ह परमेश्वर अवतार. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा उदय (अवतार) झाला.व महाराष्ट्रीय समाज श्रीचक्रधर स्वामींच्या अमृतमय ज्ञानप्रकाशाने उजळून निघाला. बाराव्या शतकात महाराष्ट्रातील वैदीक धर्म पुरोहीतांनी समाजात चातुर्वण्य व्यवस्थेचे स्तोम माजविले होते .जातीय बंधने कठोर करून तथाकथित शुद्रांना अस्पृश्यांना धर्माची दारे बंद करून गावाबाहेर हाकलून देण्यात आले होते. स्त्रियांना धर्मग्रंथ आध्ययनाचा, संन्यास घेण्याचा, धार्म...