श्री दत्तात्रेय प्रभूंचे चोवीस गुरू

श्री दत्तात्रेय प्रभूंचे चोवीस गुरू 1) पृथ्वी गुण - सहनशीलता पृथ्वीप्रमाणे सहनशील आणी द्वंद्वसहिष्णू असावे. २) वायु गुण - विरक्ती वारा थांबत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तुला मोहित होऊन आपले व्यवहार थाबवू नये. ३) आकाश गुण - अचलता आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा , नि:संग , अभेद , निर्मळ , निर्विवाद , अलिप्त आणि अचल आहे। ४) जल गुण - स्नेहभाव मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वा समवेत स्नेहभावाने वागावे. कोणाचाही पक्षपात करू नये. ५) अग्नि गुण - पवित्रता मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशीत व्हावे. ६) चन्द्रमा गुण - विकार बाधा न होणे ज्या प्रमाणे चंद्राच्या कलेत उणे - अधिकपणा असुन त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही. त्या प्रमाणे आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत. ७) सुर्य गुण - निपक्षपातीपणा सुर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तुचा संचय करून परिस्थिती लक्षात आणुन निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्यांचा लाभ द्यावा पण त्यांचा अभिमान बाळगु नये. ८) कबुतर गुण - अलिप्तता जसा बहिरीससाणा कबुत्तराला परिवारासहित भक्षण करत...