श्रीमदभगवद्गीता

जय श्रीकृष्ण आज गीता जयंती आहे.त्यामुळे एक धर्मविचार आपल्या सर्वांना सांगत आहोत. आजच्या माणसाला विसर पडत चाललाय तो आपल्या संस्कारांचा. "श्रीमदभगवदगीता" आम्हां भारतीयांचा श्वास असलेला हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक धर्मग्रंथ आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निमित्य करुन संपुर्ण मानवजातीलाच जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. आपण सर्वच भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवुन शपथ घेण्याची पध्दत आहे. प्रत्यक्षात हा ईश्वरीय तत्वज्ञानाचा अत्यंत पवित्र असा धार्मिक ग्रंथ आहे आणि त्यामुळे तो पवित्र आहे. जगाचा एकमेव धर्मग्रंथ म्हणुन आपल्या या धर्मग्रंथाची इतिहासात नोंद झालेली आहे. इतिहासातील अनेक शुरविरांनी यातील कथा ऐकुन भारतीयांना स्वातंत्र्य मिळवुन दिलेले आहे. अनेक महापुरुषांनी यावर अभ्यास केला आहे. "गीताई" हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे. व लोकमान्य टिळकांनी सुध्दा तुरुंगामध्ये असताना यावर अभ्यास करुन "गीताग्रंथ" लिहीला आहे. त्याकाळी शत्रुंची आक्रमण अनेक संकट असायच...