सकारात्मक विचार - जादूची कांडी
तुम्हाला सांगतो, भगवंताने फुकट दिलेल्या गोष्टी अनमोल असतात. त्याने आपल्याला हे सुंदर जीवन दिले आहे ; अजून देवाकडून काय अपेक्षा करावी ? खरं तर रोज सकाळी उठल्याबरोबर देवाला धन्यवाद म्हणा ... हे सुंदर जीवन दिल्याबद्दल ! मी हे नित्यनेमाने गेल्या अनेक वर्षापासून करतो. आणि माझ्या सतत आनंदाचा उत्साहाचा आणि सकारात्मक विचारांचा झरा वाहू लागतो. सकारात्मक विचार हे शब्द थोडे गुळगुळीत झाल्याचे दिसतात हल्ली. पण एक सांगू ? त्याचा आत्मा हरवलेला नाही हे .. अंत:र्मनातून स्फुरलेले, रुजलेले सकारात्मक विचार हे एखाद्या जादूच्या कांडीसारखे काम करतात. रोज रात्री बिछान्यावर झोपायला गेल्यावर दिवसभरात घडलेल्या चांगल्या क्षणांचे स्मरण करा. त्या सर्वांचे आभार माना. ज्यांच्याशी तुमचा संवाद झाला, भेट झाली. आणि एखादी गोष्ट लागलीच असेल मनाला तर माफ करून टाका. बघा किती मोकळं वाटतं. मस्त झोप लागते आणि दुसऱ्या दिवसाची पहाट टवटवीत होते. माझी एक सवय आहे, चांगल्या-चांगल्या विचारांचा मी संग्रह करतो. ते अनेकांना वाचण्यासाठी पाठवतो. हे करण्यामागचा एकच उद्देश आहे “ सकारात्मक विचारांची पेरणी !” एक सकारात्मक विचार माणसाचे जीवन ...