Posts

Showing posts from June, 2022

उपदेशी नामधारक साधकांचा आचारधर्म

Image
परमार्ग      परमार्ग हा ईश्वरीचा मार्ग आहे. धर्माची जोपासना व धर्मसंस्कार आश्रमामधुन केले जातात. आश्रमामध्ये देवाची आराधना,नामस्मरण, विधी अखंड चालु असतो. तेथील संतांचा ईश्वराला अभिमान असतो म्हणुन आपण आश्रमांमधे गेल्यानंतर तेथील साधुसंतांशी प्रेमाने वागुन आदर केला पाहीजे. आपण कोणाही संतांचा अपमान करू नये त्यांचे मन दुखवू नये. असे केल्याने घोरनर्क भोगावे लागतात. सर्व साधु संतांच्या सहवासात असावे त्यांचे तन मन धनाने भजन पुजन करावे. हे त्या मार्गातील हे या मार्गातील (कपड्यांवरून) असा भेदभाव करु नये, असे केल्याने देवाला थोर खंती येते म्हणुन याची काळजी घ्यावी.       ज्योतिष इतर शास्त्राचे नियम पाळू नये तसेच तंत्र मंत्रसुद्धा करू नये गंडेदोरे, खड्याचा अंगठ्या बांधू नये छु छा यांचा मागे लागु नये कारण आपण जे सुख दु:ख पाप जोडले असेल ते तर भोगावेच लागेल.       आपल्या कर्माने जे दु:ख प्राप्त झालेले आहे ते सर्व दुःख दुर करण्यासाठी परमेश्वराचेच स्मरण व प्रार्थना करावी.  आपले दुःख इतरांना सांगत फिरु नये ज्योतिषांना आपला हात दाखवु नये. आपल्या...