श्रीपंचकृष्ण अवतार परंपरा
जय श्रीकृष्ण कृतयुगामध्ये सनक, सनकादिक, सनतकुमार व सनतनंदन हे ब्रह्मदेवाच्या वरामुळे जन्मलेले चार पुत्र. त्यांनी ब्रह्मदेवापासून सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला, "हे तात, पुष्कळ ज्ञान तुम्ही आम्हाला सांगितले, परंतु त्यामध्ये जीवांच्या उद्धाराचे म्हणजेच जन्म-मरणाच्या फे-यांपासून मुक्त होऊन परमेश्वराचे सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त करण्याचे मोक्षाचे ज्ञान सांगितले नाही. तरी ते आम्हाला सांगा." ब्रह्मदेवाला ते ज्ञान नसल्यामुळे तो चिंतातूर होऊन त्याने अंतरी परमेश्वराचा धावा केला "हे परमेश्वरा, माझी लाज राख." त्यावेळी परब्रह्म परमेश्वराने हंसावतार घेऊन सनक, सनकादिकांना ब्रह्मविद्येचे ( मोक्षमार्गाचे ) ज्ञान दिले. कृतयुगापर्यंत ते ज्ञान काही प्रमाणात होते. नंतर काळाच्या ओघात त्या ज्ञान धर्माला ग्लानी येऊन मूळ तत्व विराम पावले. त्यामुळे अनेक ऋषी - मुनी अगदी तन्मयतेने देहाची पर्वा न करता तपश्चर्या करतांना व भक्तीमार्गाविषयी चर्चा करीत असता ऋषी ऋषींमध्ये मतांतरे होऊन अवांतर भक्तीमार्ग उदयाला आले. त्या भोवऱ्यात सामान...