देव अनुभवावा लागतो

काही गोष्टीच अशा असतात की, जाऊ म्हणता सुध्दा मनातून जाता जात नाहीत. ही पण अशीच गोष्ट. हे घडलंय एक प्रसिध्द शल्य विशारद डाॅ शैलेश मेहता यांच्या बाबतीत. "वर्ल्ड फेमस काॅर्डिऑलाॅजिस्ट, अहमदाबाद, राजकोट, बडोदा" इथे. सुसज्ज हॉस्पिटल्स, हाताखाली अनेक डॉक्टर्स, स्टाफ. केवळ अपाॅईंटमेंट साठी दोन दोन महिने आधी फोन करावा लागतो, असतात बडोद्याला. डाॅक्टर सांगताहेत आपल्या मित्राला - - मित्रा! २१ डिसेंबर रोजी एक कपल बडोद्याला माझ्या रूग्णालयात आले, बरोबर ६ वर्षाची एक छोटी मुलगी. केस पेपर तयार होताच माझ्या डाॅक्टरनी छोट्या मुलीला तपासलं. सर्व तपासण्या, चाचण्यांचे रिपोर्ट मी पाहताच मुलीच्या आई वडिलांना बोलावून त्यांना माझं मत सांगितले, मुलीच्या हार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी आजार फार पुढच्या स्टेजला असल्याने तातडीने ऑपरेट करावं, अन्यथा जास्तीत जास्त ३ महिने. पण असल्या ऑपरेशनमध्येही survival rate is only 30 %. आई आणि बाबा दोघांचेही डोळे पाणावले. देवाला हात जोडून ती मला म्हणाली, डाॅक्टर आपण ऑपरेशन करा. मी मुलीला अॅडमिट करायला सांगून procedures पूर्ण करण्यास सांगितले. दुसरेच दिव...